Maharashtra Farmers Help : शेतकऱ्यांसाठी शिवसेना मैदानात, हेक्टरी 50 हजारांची मागणी
Continues below advertisement
राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, या पॅकेजवरून राजकारण सुरू झाले आहे. विरोधकांनी या मदतीला 'हा नुसता आकड्यांचा खेळ आहे' असे म्हणत टीका केली आहे. दरम्यान, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अधिक मदत मिळावी या मागणीसाठी ठाकरे गटाची शिवसेना आज राज्यभरात आंदोलन करणार आहे. या आंदोलनादरम्यान, शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी करण्यात येणार आहे. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement