Maharashtra Farmer Issue Special Report : पालकमंत्री नसल्याने जिल्हा अनाथ, शेतकरी हवालदिल
कुठे अतिवृष्टी तर कुठे गोगलगायमुळे शेतीचे नुकसान, त्यामुळे नाही म्हणायला सरकारने मदतही जाहीर केली मात्र मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकायचे कोणी असा प्रश्न आता उभा टाकलाय. कारण सरकार स्थापन होऊन दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटलाय तरी देखील राज्यात कुठेच पालकमंत्र्यांची निवड करण्यात आली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकणार कोण..