ABP News

Maharashtra Exit Poll | महायुती 121, महाविकास आघाडीला 150 जागा मिळण्याची शक्यता ABP Majha

Continues below advertisement

Maharashtra Exit Poll | महायुती 121, महाविकास आघाडीला 150 जागा मिळण्याची शक्यता ABP Majha
राज्यात एकाच टप्प्यातील मतदान आज (20 नोव्हेंबर) किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडले. यानंतर आता विविध वृत्तवाहिन्या आणि खासगी संस्थांकडून EXIT POLL सादर करण्यात आले आहेत. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये निकराची झुंज असल्याचे दिसून आलं आहे. दरम्यान, हैदराबादस्थित SAS ग्रुपकडून महाविकास आघाडी सत्तेत येण्याचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील 70 पैकी 40 ते 42 जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला जातील, असं म्हटलं आहे. दुसरीकडे, महायुतीला 27 ते 28 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे.  हिंदी वृत्तपत्र असलेल्या दैनिक भास्करकडून महाविकास आघाडीला 135 ते 150 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. महायुतीला 125 ते 140 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram