Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीची (Maharashtra Vidhansabha Election) मतदान प्रक्रिया आज पार पडली आहे. आज 5 वाजेपर्यंत राज्यात 58.22 टक्के मतदान झालं आहे. बहुतांश ठिकाणी मतदारांनी मतदानाला चांगला प्रतिसाद दिल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. दरम्यान, मतदानानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळाल्या अशी चर्चा सुरु आहे. पाहुयात एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा मिळणार? ELECTORAL EDGE चा एक्सिट पोल - 26 जागा ELECTORAL EDGE चा एक्सिट पोल समोर आला आहे. यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 26 जागा मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पोल डायरी - 27 ते 50 पोल डायरीच्या एक्सिट पोलनुसार शिवसेना शिंदे गटाला राज्यात 27 ते 50 जागा मिळणार असल्याची माहिती मिळणार आहेत. चाणक्य स्ट्रटेजीज - 48+ चाणक्य स्ट्रटेजीज एक्सिट पोलनुसार शिवसेना शिंदे गटाला राज्यात 48 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे.