Maharashtra : वीज वितरण कंपन्यांची देणी 1 लाख 22 हजार कोटींवर ABP Majha
Continues below advertisement
वीज वितरण कंपन्यांची ऊर्जा निर्मिती कंपन्यांना असलेली देणी तब्बल १ लाख २२ हजार ७६५ कोटी रुपयांवर गेलीेत. मे २०२१ मध्ये वीज वितरण कंपन्यांची वीज उत्पादकांना असलेली देणी १ लाख १७ हजार २६ कोटी रुपये इतकी होती. यानंतर केवळ एका वर्षात ही देणी १ लाख २१ हजार ७६५ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहेत. थोडक्यात, एका वर्षात या देण्यांमध्ये सुमारे ५ हजार कोटी रुपयांची वाढ झालीय. यामुळे देशातील असंख्य ऊर्जानिर्मिती प्रकल्प अडचणीत आले आहेत. परिस्थिती आणखी बिकट झाली, तर नाजूक स्थितीत असलेले ऊर्जानिर्मिती प्रकल्प संकटात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Continues below advertisement