Electricity Bill : वीज कापण्याशिवाय आता पर्याय नाही!, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Continues below advertisement

वीज थकबाकी संदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. कृषी वीजपंप ग्राहक, सार्वजनिक पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागासह विविध विभागांकडे तब्बल ८ हजार ९२४ कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राबविण्याशिवाय महावितरणकडे अन्य कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही, असं ऊर्जामंत्र्यांनी या पत्रात नमूद केलंय. ग्रामविकास विभाग आणि नगरविकास विभागाकडे प्रचंड थकबाकी असल्याकडेही ऊर्जामंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलंय. या विभागांवर कारवाई केल्यास महाविकास आघाडी सरकार विरोधात असंतोष निर्माण होऊ शकतो असं ऊर्जामंत्र्यांनी या पत्रात म्हटलंय. तसंच सरकारकडे कोट्यवधी रुपयांचे अनुदान अडकले आहे. वीज थकबाकी आणि अनुदान देेण्याचा आदेश द्या आणि महावितरणची ढासळती आर्थिक स्थिती सावरण्यासाठी सहकार्य करा, असे साकडंही ऊर्जामंत्र्यांनी घातले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram