Maharashtra Voting Misconduct Special Report : राडा, गोंधळ, मनस्ताप...मतदारांचा संताप!

Continues below advertisement

ठाणे : निवडणूक आणि मतदार याद्यांचा घोळ हे समीकरण गेल्या अनेक निवडणुकांपासून सुरू आहे, ते या निवडणुकीतही पाहायला मिळालं. भिवंडी लोकसभा मतदारसंघात कल्याण पश्चिम मध्ये हजारो नागरिकांची नावे मतदार यादीतून अचानक गायब झाली आहेत. एकूण आकडेवारी पाहता कल्याण लोकसभेमध्ये 80 हजारांहून जास्त तर भिवंडी लोकसभेसाठी एक लाखांहून जास्त मतदारांची नावं गायब झाल्याचं दिसतंय. 

आज सकाळी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी नागरिक मोठ्या उत्साहात मतदान केंद्रात पोहोचले होते. त्यांचे वोटिंग कार्ड त्यांच्याजवल होते, पण मतदार यादी तपासली असता त्यांचं नावच मतदार यादीत नव्हतं. अनेकदा त्या मतदार याद्या त्यांनी डोळ्याखालून घातल्या. मात्र नाव न दिसून आल्याने या नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली. कल्याण पश्चिमेकडील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात असलेल्या मतदान केंद्रात या नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाचे अक्षरशः वाभाडे काढले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram