Hindi Language Controversy | पहिलीपासून हिंदी शिक्षण केवळ मौखिक, सरकारचा नवा तर्क
त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली पहिलीपासून हिंदी शिकवण्याला सर्व क्षेत्रातून विरोध होत आहे. मनसे, ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नवा तर्क मांडला आहे. "पहिलीपासून हिंदी शिक्षण हे केवळ मौखिक असेल, परीक्षा नसेल" असे शिक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. सरकार मात्र हिंदी शिक्षण रेटण्यावर भर देत असल्याचे दिसत आहे.