Maharashtra Drought Special Report : राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये पाणीसंकट

Continues below advertisement

Maharashtra Drought Special Report : राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये पाणीसंकट

बातमी राज्यातील दुष्काळाची.. राज्यावर दुष्काळाचे ढग दाटलेत.. जलसाठे कोरडेठाक पडलेत. विहिरींनी तळ गाठलाय. तब्बल २५ जिल्ह्यांमध्ये पाणीकपातीची टांगती तलवार आहे.. संभाजीनगरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती आहे..माणसांसोबतच जनावरांनाही दुष्काळाचा चटका सहन करावा लागतोय...जनावरांचा चारा खरेदी करण्यासाठी एका कुटुंबाने दागिने गहाण ठेवलेत.. तर तिकडे सांगलीच्या जतमधील गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जातोय.

या भयान दुष्काळाचा फटका जसा माणसाला बसतोय तसाच मुक्या जनावरांनाही बसतोय .छत्रपती संभाजी नगर मध्ये चाऱ्या अभावी गोशाळा कशा चालवायच्या हा प्रश्न  गोशाळा चालकांना पडलाय. संभाजीनगर जिल्ह्यातील पारुंडी गावातील पारसनाथ गोशाळा चालकांनी आपले घरातील दागिने गहाण ठेवून चारा खरेदी केला आहे. आता त्यांच्याकडे केवळ दोन दिवसच पुरेल एवढा चारा शिल्लक आहे. त्यामुळे त्यांनी गोशाळाला चारा देण्याचं आवाहन केलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram