Maharashtra Drought Special Report : धरणं आटले, विहीरी, नद्या कोरड्या ठाक, राज्यावर दुष्काळाचं संकट
Continues below advertisement
Maharashtra Drought Special Report : धरणं आटले, विहीरी, नद्या कोरड्या ठाक, राज्यावर दुष्काळाचं संकट
एका खांद्यावर कळशी आणि दुसऱ्या हातात
लहानगं बाळ घेऊन, या महिलेची पायपीट
चाललीय ती घोटभर पाण्यासाठी...
पाणी कुठे मिळेल हे माहीत नाही, पण,
तरीही घराबाहेर पडायचं आणि पाण्याचा
शोध घ्यायचा... जिथे पाणी मिळेल तिथून
ते घ्यायचं आणि पुन्हा पायपीट करत घरी
यायचं... धाराशिवच्या अनेक गावांचू तहीन
डोक्यावरच्या हंड्यावर अवलंबून आहे...
मे महिन्याची २४ तारीख उलटलीय. तळपणारा सूर्य मी म्हणू लागलाय. साठवलेल्या पाण्याची वाफ आभाळाकडे धावतेय आणि आभाळ मात्र उन्हाच्या झळा देतंय. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मात्र जमिनी भेगाळल्यात. पिकं करपलीयेत. पाणीसाठा घटतोय. तर, चिंता दिवसागणिक वाढू लागलीय. राज्यावरील दुष्काळाच्या छायेने काळजामधील काळजीत भर घातलीय.
Continues below advertisement