Buldhana Strike | बुलढाण्यात एलोपेथिक डॉक्टर्स संपावर, रुग्णांचे हाल

राज्य सरकारने आधुनिक वैद्यकशास्त्रातील CCMP कोर्स केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणीचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार आजपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि इतर संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्व ऍलोपॅथी डॉक्टरांचे दवाखाने आज चोवीस तास बंद राहणार आहेत. आज सकाळी आठ वाजेपासून उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत हा संप सुरू राहील. राज्यातील जवळपास दीड लाख ऍलोपॅथी डॉक्टर्स या संपात सहभागी झाले आहेत. सर्व खाजगी रुग्णालयेही बंद असल्याने राज्यातील रुग्णांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. बुलढाण्यातून आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. राज्यातील दीड लाख ऍलोपॅथी डॉक्टर्स संपावर असल्याने रुग्णांना मोठा फटका बसत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola