Maharashtra Doctor Strike : राज्यभरातील जवळपास सात हजार निवासी डॉक्टर सलग दुसऱ्या दिवशीही संपावरच
Continues below advertisement
राज्यभरातील जवळपास सात हजार निवासी डॉक्टर सलग दुसऱ्या दिवशीही संपावरच आहेत. त्याचा फटका रुग्णांना बसतोय. संप मागे घेण्याचं आवाहन सरकारने करूनही मार्डचे डॉक्टर संपावर ठाम आहेत. वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या एक हजार ४३२ जागांची पदनिर्मिती करावी, शासकीय रुग्णालयं आणि महाविद्यालयांत नवी वसतीगृहं बांधावीत, सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यापकांची अपुरी पदं तातडीनं भरावीत, महागाई भत्ता तात्काळ देण्यात यावा आणि निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करावं अशा निवासी डॉक्टरांच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत. त्या मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे.
Continues below advertisement