Ajit Pawar Corona Positive | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

Continues below advertisement

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्ड रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अजित पवार यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे. "आपली प्रकृती उत्तम असून विश्रांतीनंतर लवकरच आपल्यासोबत असेन," असं अजित पवारांनी म्हटलं आहे. थकवा जाणवत असल्याने अजित पवार गेल्या चार दिवसांपासून होम क्वॉरन्टाईंन होते. यानंतर आज सकाळी ते ब्रीच कॅण्ड रुग्णालयात दाखल झाले.

"माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन, असं अजित पवार यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram