Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त; ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून डिस्चार्ज

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून त्यांना आजच (2 नोव्हेंबर) डिस्चार्ज मिळाला. अजित पवार आठवडाभर घरातच विश्रांती करणार आहेत. अजित पवार यांची बहीण आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून अजित पवार कोरोनामुक्त झाल्याचं सांगितलं.

थकवा जाणवत असल्याने अजित पवार चार दिवस होम क्वॉरन्टाईन होते. परंतु कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अजित पवार यांना 26 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आठवडाभर उपचार घेतल्यानंतर आज ते कोरोनातून बरे होऊन घरी परतले. अजितदादांनी आता आठवडाभर तरी आराम करावा अशी काळजी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola