रत्नागिरी आणि जळगावात Delta Plus Variantचे रुग्ण ; दोन्ही जिल्ह्यांत प्रशासनाकडून निर्बंध कडक
कोरोनाची परिस्थिती पाहता राज्यात निर्बंध कडक करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमिवर रत्नागिरी जिल्ह्यात नागरिकांना देखील यापूर्वीचेच नियम कायम असणार आहेत. जिल्ह्यात 9 रूग्ण डेल्टा प्लॅसचे आढळून आले होते. त्यामुळे निर्बंधांमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही. ज्या भागात डेल्टा प्लॅसचे रूग्ण आढळून आले होते, त्या भागात नियमांची कडम अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्ह्याच्या पॉझिटीव्हीटी रेट हा 10 टक्क्यांच्या आसपास असून जिल्हा प्रशासनानं ग्राम कृती दलांना देखील पुन्हा एकदा सक्रीय केलं आहे.
तर जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ही चांगलाच कहर माजवला असल्याचं पाहायला मिळाले होते. मे महिन्यात रुग्णसंख्या वाढती असतानाच एका गावात प्रमाणापेक्षा जास्त कोरोनाचे जास्त रुग्ण आढळून आले होते. या मागील कारणांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने या गावात सिरो सर्व्हे करीत शंभर जणांचे नमुने संकलित केले होते त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून त्यातील सात जण हे डेल्टा प्लस या नवीन प्रकारच्या विषाणूमुळे बाधित आढळून आले आहे.