Maharashtra Dam Water Level : राज्यातील धरणांमधील जलसाठ्यात वाढ, कोणत्या धरणांत किती पाणीसाठा?
Continues below advertisement
राज्यातील प्रमुख ३२ धरणांमधील जलसाठ्यात महिनाभरात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. ही धरणे सध्या ५५ टक्के भरली आहेत. हा आकडा दहा वर्षांच्या सरासरीहून अधिक असला तरी मागील वर्षीपेक्षा त्यात सुमारे ३० टक्क्यांची तूट आहे. केंद्रीय जल आयोगाकडून देशभरातील प्रमुख १४६ धरणं आणि जलाशयांवर देखरेख ठेवली जाते. त्यातील सर्वाधिक ३२ धरणे ही महाराष्ट्रात आहेत. १४६ धरणांमध्ये ३० जून अखेरीस ६९ टक्के पाणीसाठा होता. राज्यातील ३२ धरणे त्यावेळी फक्त २१ टक्के भरलेली होती. हा आकडा आता ५५ टक्क्यांवर गेल्यानं काहीशी समाधानकारक स्थिती आहे.
Continues below advertisement