Maharashtra Curfew | संचारबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी परभणीचे जिल्हाधिकारी रस्त्यावर

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी जाहीर केली. मात्र यात अनेक आस्थापनांना मुभा असल्याने मोठी गर्दी होत होती. त्यामुळे परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी राज्य शासनाच्या आदेशांनंतर एक आदेश काढून जिल्ह्यात आजपासून 22 एप्रिलपर्यंत केवळ अत्यावश्यक सेवांनाच मुभा दिली आहे. त्यामुळे किराणा दुकान, भाजी विक्री, फळ बाजार, बेकरी, रस्त्यावरही खाद्य पदार्थ विक्री बंद असणार आहे. शिवाय अत्यावश्यक सेवा देणारेच शासकीय कार्यालय सुरु ठेवून इतर सर्व कार्यालय बंद ठेवण्यात आली आहेत. या संचारबंदीची कडक अंमलबजावणी स्वतः जिल्हाधिकारी रस्त्यावर उतरुन करत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola