40 अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आल्याशिवाय एसटी सुटत नाही;बीड बस स्थानकात बऱ्याच कर्मचाऱ्यांचा खोळंबा

राज्यामध्ये कोरोनामुळे निर्बंध लागले असतानाच एसटीसुद्धा सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे. मात्र या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ये जा करण्यासाठी एसटी सुरू असणार आहे. मात्र ज्या शहराला जायचंय त्या शहरात जाण्यास चाळीस कर्मचारी एकत्रित आल्यानंतरच एसटी सोडली जाते आहे, त्यामुळे बर्‍याच ठिकाणचे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी हे बीड बस स्थानकात अडकून पडलेत कारण त्यांना ज्या गावाला जायचे आहे तिथले 40 लोक एकत्रित आल्याशिवाय एसटी सोडली जात नाही .

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola