Maharashtra COVID : कोविड पॉझिटिव्ह असल्यास 5 दिवस गृहविलगीकरणात राहा, टास्क फोर्सचा सल्ला
Continues below advertisement
कोरोनाची लागण झाल्यास रुग्णांनी पाच दिवस गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सने दिला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज यासंदर्भात नियमावली जारी करण्यात येणार असल्याचं समजतं. दरम्यान राज्यात कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ८६२ वर पोहोचली आहे. परदेशातून भारतात येणाऱ्यांवर कोणतेही निर्बंध लावण्यात येणार नसल्याची माहिती मिळतेय... येणाऱ्या सणांच्या काळात पुढील १५-२० दिवस महत्त्वाचे असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय... जिल्ह्यांमधील रुग्णालय सुविधांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचंही टास्क फोर्सनं सांगितलंय.
Continues below advertisement