Coronavirus Updates | तुमच्या शहरात काय बंद?
राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे, मुंबई आणि अहमदनगरमध्ये नवे रुग्ण आढळल्यानं आता राज्यातील कोरानग्रस्तांचा आकडा १९ वर पोहचला आहे. दुबईहून आलेल्या ४० जणांच्या गटातील नगरच्या एकाला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. त्यामुळे आता नगर जिल्हा आरोग्य खातंही खडबडून जागं झालंय. तर, मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झालीए. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात येणं टाळा, अत्यावश्यक असेल तेव्हाच गर्दीच्या ठिकाणी जा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Tags :
Coronavirus Symptoms Japan CoronaVirus Outbreak Coronavirus In Maharashtra China Coronavirus Updates India Coronavirus Covid 19