Maharashtra Corona : कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, राज्यात 24 तासात 425 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Continues below advertisement

महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णवाढीत घट होताना दिसत नाहीय... सलग दुसऱ्या दिवशी तीन हजारांहून जास्त रुग्णांची नोंद झालीय... गेल्या 24 तासांत देशभरात 3 हजार 95 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या सहा महिन्यांतील ही रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या आहे. तर चाचण्यांच्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळण्याचं प्रमाण 1.71 वरून 1.91 वर गेलाय. तर महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 425, तर मुंबईत 172 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर मुंबई महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या तयारीचा वेग वाढवलाय. पालिकेने शहरातील दोन रुग्णालयांसह तीन ठिकाणी जम्बो करोना केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रक्तशुद्धीकरण केंद्र, शस्त्रक्रियागृह, लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग आदी सुविधा या केंद्रामध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram