Maharashtra Corona Outbreak : महाराष्ट्रात आज दिवसभरात 3900 नवे कोरोनाचे रुग्ण, आकड्यात मोठी वाढ
abp majha web team
Updated at:
29 Dec 2021 11:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल 3 हजार 900 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1309 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील दोन- तीन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने तीन हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. त्यातच नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.