Maharashtra Congress: निवडणुकांच्या तोंडावर नाना पटोलेंच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये मेगाभरती

Continues below advertisement

काँग्रेसने आगामी महापालिका निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मेगा भरती झाली आहे. मागील महिमन्यात काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढण्याचा नारा दिल्या नंतर मालेगावमध्ये काँग्रेसच्या माजी आमदार, महापौरांसह नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याची आज कॉग्रेसने राष्ट्रवादीला परतफेड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेला खिंडार पाडून महत्वाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. आज मुंबईतील टिळक भवन इथं मंत्री अशोक चव्हाण आणि काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.  राष्ट्रवादीकडे असलेल्या सेलू नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह सर्व २०  नगरसेवकांनी काॅग्रेसमध्ये प्रवेश केलाय. तर नांदेड, औरंगाबादमधील राष्ट्रवादीच्या महत्वपूर्ण पदाधिका-यांचा तसंच, भाजपच्याही कार्यकर्त्यांचाही काॅग्रेसमध्ये पक्षप्रवेश झालाय. दरम्यान पंतप्रधानांच्या वक्तव्याविरोधात देवेंद्र फडणविस यांच्या सागर बंगल्यासमोर काॅग्रेस आंदोलन करणार
असल्याची माहिता कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram