Local Body Elections स्था. स्व. संस्था निवडणूक काँग्रेस स्वतंत्र लढणार? सपकाळांकडून एकला चलो चा नारा
Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 'एकला चलो'चा नारा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आघाडीसोबत लढायचे की स्वतंत्र लढायचे, याचे अधिकार जिल्हा संघटनेला देण्यात आले आहेत. जिल्हा काँग्रेस कमिटी आणि ब्लॉक काँग्रेस कमिटी या स्तरावर अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. पक्षाने निरीक्षकही पाठवले आहेत. "त्या ठिकाणचा जो निर्णय असेल त्या निर्णयाला संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आमचा समर्थन राहील," असे सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे नागपूरमध्ये काँग्रेसच्या जोरावर निवडणूक लढू पाहणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसेनेची आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची मात्र गोची झाली आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे स्थानिक पातळीवरील राजकारणात मोठे बदल अपेक्षित आहेत. जिल्हा युनिट्सना मिळालेल्या या स्वातंत्र्यामुळे आघाडीच्या समीकरणात अनिश्चितता निर्माण झाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement