Maharashtra Congress : महाराष्ट्र काँग्रेसचं चिंतन शिबीर, पटोले, थोरातांना काय वाटतं? ABP Majha
शिर्डीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे दोन दिवसीय चिंतन शिबीर आजपासून सुरु होतंय. विविध प्रश्नांबाबत पक्षाची दिशा आणि धोरणं काय असावीत याबाबत या शिबिरात चर्चा होणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्य प्रभारी एच.के.पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह राज्यातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी या शिबिराला उपस्थित राहतील. उदयपूरच्या कांग्रेसच्या देशस्तरीय शिबीरामध्ये राज्यांमध्येही चिंतन शिबीर घेण्याचं हायकमांडनं सांगितलं होतं. त्यानुसार हे शिबीर होतंय. या शिबिरात चर्चा करण्यासाठी सहा विषय समिती तयार करण्यात आल्यात. या समित्या आधी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर या विषय समित्यांची एकत्रित चर्चा होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या शिबीरात चर्चा करण्यासाठी कोणत्या समिती तयार करण्यात आल्यात पाहूयात.