Maharashtra Collage Reopen : राज्यात 20 ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरु होणार; Uday Samant PC

मुंबई : महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यातील कॉलेज 20 ऑक्टोबरपासून (Collage Reopen) सुरू करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे. ते म्हणाले की, कॉलेज सुरू करताना आम्ही नियमावली तयार केली असून सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयांना ती पाठवणार आहे. त्यानुसारच 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने महाविद्यालय सुरु करण्यासाठी स्थानिक प्राधिकरणाशी चर्चा करुन निर्णय घ्यायचा आहे. हा अधिकार आम्ही विद्यापीठांना दिला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola