Maharashtra Cold Waves : पुढील 24 तासात थंडीच्या लाटेचा अंदाज, सर्वाधिक थंडी नाशिकमध्ये
गेल्या तीन-चार दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. तसेच येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. त्यामुळे गारवा वाढल्याने थंडीची लाट राज्यात कायम राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वच ठिकाणी थंडीचा कडाका वाढलाय.. नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यातील तापमान १० अंशावर खाली राहण्याचा अंदाज आहे.. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरातही ठिकठिकाणी शेकोट्या पेटायला सुरुवात झालीेये..