Satara Mahabaleshwar : महाबळेश्वर गारठलं ; स्ट्रॉबेरीच्या उत्पादनावर परिणाम ABP Majha

उत्तरेकडे आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यात दिसून येतोय. थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरात कालच्या तुलनेत आज पारा चांगलाच घसरलाय. वेण्णा लेक परिसरात मध्यरात्री शून्य अंश तापमानाची नोंद झालेली आहे. तर सकाळी ६ वाजता वेण्णालेकवर १ अंश तापमानाची नोंद झालेय. कालच्या तुलनेत वेण्णालेकवर तापमान तब्बल ४ अंशांनी घसरलं  आहे. तापमान शून्य अंशांवर आल्यानं महाबळेश्वरात दवबिंदू गोठले होते. त्यामुळे महाबळेश्वरात काश्मीरसारखा आभास होत होता. पर्यटकही गुलाबी थंडीचा आनंद लुटताना दिसले.

महाबळेश्वरमधल्या थंडीचा थेट स्ट्रॉबेरीच्या बागेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola