Cold Wave : उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे महाराष्ट्र गारठला, नंदुरबारमध्ये पार 7 अंश सेल्सिअसवर
उत्तर भारतातील तीव्र थंडीची लाट आणि बर्फवृष्टीचा परिणाम जिल्ह्यातही जाणवू लागला आहे. सर्वत्र किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे आणि मागील तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात आज दि. 10 जानेवारी रोजी निच्चांकी 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.