Maharashtra CMO Office : शपथविधीला 12 दिवस उलटूनही मुख्यमंत्री कार्यालयात अधिकाऱ्यांची प्रतीक्षा
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेऊन बारा दिवस उलटून गेलेत. मात्र अद्यापही मुख्यमंत्री कार्यालय सुरू झालेलं नाही. राज्यातील नागरिकांना त्यांच्या समस्यांवर दाद मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं कार्यालय आशेचा किरण असतं. पण गेल्या १२ दिवसांपासून मुख्यमंत्री कार्यालयात अधिकारीच उपस्थित नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे दाद मागायची असेल तर जायचं तरी कुठं असा सवाल उपस्थित होतोय. मंत्रिमंडळाच्या विस्ताराप्रमाणेच मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नेमणुकांचीही अजूनही प्रतीक्षा आहे.