Maharashtra Fund| CM ची DCM च्या Urban Development निधीवर 'बारीक नजर'
नगरविकास विभागाचा मोठा निधी वर्ग करायचा असेल तरी फाईल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभाग आहे, मात्र या खात्याच्या मोठ्या निधी वाटपाला मुख्यमंत्र्यांची परवानगी लागणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडीकडे डोळ्यासमोर ठेवून निधी वाटपाला मुख्यमंत्र्यांनी लगाम घातल्याचे दिसत आहे. नगरविकास विभागाचा निधी स्वपक्षीय आमदार आणि नगरसेवक यांना दिला जातो, त्यामुळे मित्र पक्ष असलेल्या आमदारांना आणि नगरसेवकांना निधी मिळत नाही अशी तक्रार होती. त्यासोबतच निधीचं समप्रमाणात प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाटप झालं आहे की नाही याचीही खात्री मुख्यमंत्री कार्यालय करणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाच्या निधीवर आता मुख्यमंत्र्यांची बारीक नजर आहे असे बोलले जात आहे. 'बैलगाडीचे मालक मुख्यमंत्री आहेत आणि बैलगाडी ओढणारे एक बारामतीकर आणि दुसरे ठाणेकर आहेत,' असा टोला बडेट्टीवारांनी मारला आहे. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा समन्वय उत्तम आहे, त्यामुळे फारसा फरक पडणार नाही असे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे म्हणणे आहे.