Blood Shortage | महाराष्ट्रात रक्ताची आणीबाणीसदृश स्थिती; केवळ एक दिवस पुरेल एवढा रक्तसाठा
राज्यात रक्ताची आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, केवळ एक दिवस पुरेल इतका रक्तसाठा उपलब्ध आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदानाचे आवाहन केल्यानंतर दाते रक्तदानासाठी पुढे येतील, अशी अपेक्षा राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहसंचालक डॉ. अरुण थोरात यांनी व्यक्त केली.