Devendra Fadnavisवादग्रस्त विधाने खपवून घेणार नाही,मुख्यमंत्र्यांनी 20मिनिटं घेतला मंत्र्यांचा क्लास
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचा क्लास घेतला. सुमारे वीस मिनिटे ही बैठक चालली. वादग्रस्त विधाने आणि कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. "असे प्रकार होत राहिले तर सरकारची प्रचंड बदनामी होते आणि ही अखेरची संधी आहे. काय कारवाई करायची ती करूच पण आता एकही प्रकार खपवून घेणार नाही," असे सांगण्यात आले. सर्व मंत्र्यांना ही तंबी देण्यात आली आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि आमदार संजय गायकवाड यांनी गेल्या काही दिवसांत सरकारला अडचणीत आणले होते. गोपीचंद पडळकर आणि जितीन रावण यांच्या कार्यकार्यत्वामधील राडा प्रकरणही समोर आले होते. काही प्रकरणे तर अधिवेशन काळातच घडली, ज्यामुळे सरकारची चांगलीच अडचण झाली होती. यापुढे अशा घटनांवर कठोर कारवाई केली जाईल.