UNCUT CM Speech | शेतकरी कर्जमाफी, 10 रुपयांत शिवभोजन, मुख्यमंत्र्यांकडून शेवटच्या दिवशी घोषणांचा पाऊस | ABP Majha

Continues below advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी घोषणांचा पाऊसच पाडला. शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय, दहा रुपयात शिवभोजन यासह अनेक घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांसह सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची उत्तरं देखील दिली. राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019’ ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. सप्टेंबर 2019 पर्यंत या योजनेंतर्गत प्रति शेतकरी दोन लाख या कमाल मर्यादेपर्यंत लाभ मिळणार आहे. तसेच गोरगरीबांना 10 रुपयामध्ये शिवभोजन योजना सुरु करणार असल्याची घोषणा देखील ठाकरे यांनी केली. ही योजना प्रायोगिक तत्वावर राज्यात 50 ठिकाणी सुरु होणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram