Maha Polls 2025: भाजप-RSS ची मुंबईत गुप्त बैठक, 'महायुतीत जास्त जागा मिळवण्यावर भर', फडणवीसांची रणनीती
Continues below advertisement
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत (Mumbai) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपची (BJP) एक महत्त्वाची बैठक पार पडली. 'महायुतीसोबतच निवडणूक लढवताना अधिक जागा मिळविण्यावर भाजपाचा भर आहे,' असे या बैठकीतून समोर आले आहे. येत्या ११ नोव्हेंबर रोजी केंद्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश (Shivprakash) यांच्या उपस्थितीत पुन्हा एक बैठक होणार आहे, ज्यात निवडणुकीची पुढील रणनीती आणि जबाबदारीचे वाटप निश्चित केले जाईल. चार वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. अनेक पक्षांनी स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरू केली असून भाजपने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, भंडारा आणि अकोल्यात स्वबळाचा नारा दिला आहे. तर दुसरीकडे, सिंधुदुर्गमध्ये राणे कुटुंबातच निवडणुकीवरून मतभेद समोर आले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement