
Maharashtra Child Marriage : 3 वर्षात 15 हजारांहून अधिक बालविवाह, पुरोगामी महाराष्ट्राची शोकांतिका
Continues below advertisement
पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातील आता एका मोठी धक्कादायक बातमी... राज्यात १५ हजारांहून अधिक बालविवाह झाल्याची कबुली खुद्द सरकारनेच लेखी उत्तरात दिलीय... एवढंच नाही तर १८ वर्षांखालील तब्बल १५ हजार २५३ मुली अल्पवयीन माता बनल्याचीही माहिती समोर आलीय... या बालमातांची माहिती त्रिसदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालातील आहे.... गंभीर बाब म्हणजे ३ वर्षांत केवळ १० टक्के बालविवाह सरकार रोखू शकलंय... त्यामुळे राज्यात बालविवाहांची समस्य़ा किती गंभीर आहे, हे रोखण्यास सरकारचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचं स्पष्ट झालंय...
Continues below advertisement