Maharashtra Cabinet Portfolio : राष्ट्रवादीकडची महत्वाची खाती फडणवीसांच्या हाती ABP Majha

Maharashtra Cabinet : महाविकास आघाडी सरकारमध्ये निधी मिळत नाही, आमची कुचंबणा होत आहे असा थेट आरोप शिवसेना आणि काँग्रेसच्या मंत्र्यांकडून राष्ट्रवादी आणि विशेष करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर होत होता. एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांसह बंड करून भाजपच्या साथीत मुख्यमंत्रिपद मिळवले. मात्र, खातेवाटपात पूर्णत: देवेंद्र फडणवीस यांचाच बोलबाला राहिला आहे. त्यामुळे जी ओरड अजित पवारांविरोधात झाली, तीच ओरड आता शिंदे गटातील मंत्र्यांकडून जाहीरपणे नाही झाली, तरी अंतर्गत नक्की होतील, अशीच स्पष्ट चिन्हे आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola