Maharashtra Cabinet : मंत्रिपदी बढती, सुरु झाडाझडती; बावनुकळे, शिरसाट, कदमांकडून अधिकाऱ्यांना तंबी

Continues below advertisement

पदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर अनेक मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती...गैरप्रकार खपवून घेणार नाही, बावनुकळे, संजय शिरसाट आणि योगेश कदमांकडून अधिकाऱ्यांना तंबी...

देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना त्यांची खाती मिळाली असून आता ते पदभार स्विकारून कामालाही लागलेयत. अनेक मंत्री अधिकाऱ्यांमध्ये जरब बसवण्यासाठी थेट भेटी देऊन दरडावणीच्या सुरात आदेश आणि सूचना देत आहेत, त्यांना एकप्रकारे धमकावतच आहेत. गैरप्रकार खपवून घेणार नाही अशी तंबीच ते देत आहेत...संजय शिरसाट, योगेश कदम या नवख्या मंत्र्यांसह मंत्रिपदाचा अनुभव असलेले चंद्रशेखर बावनकुळेसुद्धा अधिकाऱ्यांना इशारे देतायत..

मंत्रिमंडळ विस्तार होऊन अनेक दिवस उलटले आणि आता हळूहळू मंत्री आपल्या पदाचा पदभार स्वीकार लागले.. मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताच अनेक मंत्री अॅक्शनमोडवर दिसून आले.. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी करचोरी, करगळती रोखण्याच्या कर्तव्यात हयगय खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दादांनी दिला.. तर दुसरीकडे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसेंनी मालेगाव शासकीय विश्रामगृहात शिक्षकांची बैठक घेत तालुक्यातील शिक्षकांच्या अडचणी जाणून घेतल्या..दरम्यान प्रताप सरनाईक आज मंत्रिपदाचा कारभार स्वीकारताना भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.. भुर्जीची गाडी लावत, रिक्षा चालवणाऱ्या सरनाईकांनी, थेट राज्याचा मंत्री म्हणून कामाचा गाडा हाकायला सुरूवात केलीय..  

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram