Maharashtra Cabinet : मराठा आरक्षण अहवालावर मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब,शिंदे कॅबिनेटचे 5 मोठे निर्णय
Continues below advertisement
मुंबई : मराठा आरक्षणाचे आंदोलन (Maratha Reservation Protest) आता उग्र होत असून दुसरीकडे राज्य सरकारने नेमलेल्या निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकारण्यात आला आहे. . मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी (Kunbi) प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीने आज प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आला. मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून उद्यापासून कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यास सुरुवात होईल.
Continues below advertisement