Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंळाची बैठक; राज्य सरकारने केलेल्या अनेक योजनांचा आढावा

Continues below advertisement

Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंळाची बैठक; राज्य सरकारने केलेल्या अनेक योजनांचा आढावा 

राज्य सरकारनं (Maharashtra News) अर्थसंकल्पात (Budget 2024) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) योजनेची घोषणा केली. या योजनेच्या घोषणेनंतर राज्यभरातून महिलांनी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गर्दी केली. मध्य प्रदेशच्या लाडली बहना योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे. यानंतर आता असंघटित क्षेत्रातील मोलकरणींसाठी देखील सरकार लवकरच एक गृहोपयोगी साहित्य वाटपासंदर्भातील योजनेवर काम करत आहे. लोकसत्तानं यासंदर्भात माहिती दिली. तसेच, राज्यात तब्बल 10 ते 12 लाख घरगुती कामगार- मोलकरणींची संख्या असल्याची माहिती सरकारच्याच वतीनं जाहीर करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या या योजनेंतर्गत स्वयंपाक घरातील कुकरसह 21 भांड्यांचा सुमारे 10 हजार रुपये किमतीचा संच घरगुती कामगार महिलांना देण्याची तरतूद केली जाणार आहे. अशा संचांचं वाटप होणार असल्याची अफवा छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांत पसरल्यानंतर एकच गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालं. मात्र, संचवाटप केवळ नोंदणीधारक घरगुती मोलकरणींनाच होणार असल्याची माहिती मिळताच गर्दी ओसरली. त्यानंतर मोलकरीण म्हणून अधिकृत नोंदणी करण्यासाठी महिलांची धावपळ सुरू झाली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram