Maharashtra Cabinet Meeting : आज पूरग्रस्तांना मदत जाहीर होणार ABP Majha

Continues below advertisement

मुख्यमंत्र्यांनी पूर आणि दरडग्रस्त भागांचे दौरे पूर्ण केल्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होतेय. या बैठकीत पूरग्रस्त भागातील नुकसानाबाबत चर्चा केली जाईल. त्यामुळे राज्य सरकार आज पूरग्रस्त आणि दरड कोसळलेल्या भागांना मदत जाहीर करणार का, याकडे राज्याचं लक्ष असेल.
 दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील पूरस्थिती उद्भवलेल्या भागातील मालमत्तेच्या पंचनाम्याचं काम पूर्ण झालंय. त्यानुसार वारसांना मदतीची कार्यवाहीदेखील जिल्हा प्रशासनानं सुरु केली. सध्या रत्नागिरीतील अतिवृष्टीनं बाधित झालेल्या ८६ गावांमधील १६२६ कुटुंबांंना मदत करण्यात आली आहे. तर अतिवृष्टी आणि पुरामुळे हानी झालेल्या भागातील रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसाठी २ हजार २२४ कोटींची आवश्यकता असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram