ABP News

Maharashtra Cabinet Expansion : प्रतीक्षा फोनची, डोळे मंत्रिपदाकडे, मला मंत्रिपद मिळावं कारण...

Continues below advertisement

खरंतर, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात राजकीय जागरण आणि गोंधळ सुरूच आहे... रोजच्या रोज आरोपांच्या दिवट्या नाचवल्या जातायत... एकमेकांवर गळे काढले जातायत. बरं, एवढं सगळं रामायण होऊन, महाराष्ट्रात सरकारचा मांडव उभा राहिला... त्यात आता अजित पवारही सहभागी झाले... मात्र, मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाच्या अक्षता काही पडायचं नाव घेईनात. कोण मंत्रिपदासाठी अडून बसलंय, तर कुणी खात्यांसाठी रुसून बसलंय... आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या कामांची पंगत काही बसेना. आता यावर चर्चा करण्यासाठी अजित पवार दिल्लीला गेलेत. भाजपच्या दिल्लीश्वरांशी ते चर्चा करतील... मात्र, तीन इंजिनांचं सरकार सध्या अस्तित्वात आहे... त्याचं त्रिशूळ असं बारसंही झालंय... मात्र विस्तार आणि खातेवाटपाचा पाळणा काही हलेना. आता त्याची दोरी दिल्लीच्या हाती गेलीय. आता ते जे सांगतील, त्यावरूनच इकडे विस्तार आणि खात्यांबाबत मम म्हटलं जाईल...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram