Maharashtra Cabinet Expansion च्या हालचालींना वेग, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार
Continues below advertisement
Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Cabinet Expansion) हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील आज दिल्लीत जाणार आहेत. तिन्ही नेते एकत्रित जाणार नाहीत. मात्र दिल्लीत गेल्यावर तिथे तिघांची भेट होईल. दिल्लीत हे तिन्ही नेते भाजपश्रेष्ठींची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
Continues below advertisement