ABP News

Maharashtra Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता

Continues below advertisement

Maharashtra Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठे बदल होण्याची शक्यता असून राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये काही मंत्र्यांची खाती बदलली जातील, तसेच काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही असे नेते नाराज होऊ नयेत म्हणून त्यांची वर्णी महामंडळावर लावण्यात येणार आहे.

पालकमंत्रिपदांची आदलाबदल

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हा बदल केला जाणार असून काही पालकमंत्रीपदांचीही अदलाबदल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच ज्या महामंडळावर अद्याप कोणतीही नियुक्ती करण्यात आली नाही त्यावरही नियुक्ती केली जाणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात प्राथमिक चर्चाही झाल्याची माहिती मिळत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram