Maharashtra Cabinet Expansion : Ajit Pawar वगळता नव्या मंत्र्यांना ना खाती, ना बंगले
Maharashtra Cabinet Expansion : Ajit Pawar वगळता नव्या मंत्र्यांना ना खाती, ना बंगले
राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी मंत्री पदाची शपथ घेऊन आठवडा उलटला आहे. मात्र अद्यापही ते बिन खात्याचेच मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विशिष्ठ खात्यांचा आग्रह धरला जातोय, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. म्हणजेच अर्थ, ग्रामविकास, सामाजिक न्याय, ऊर्जा, गृहनिर्माण,महिला आणि बालविकास आणि अल्पसंख्याक ही खाती राष्ट्रवादीला हवी आहेत. तसंच, शालेय शिक्षण आणि उच्च-तंत्र शिक्षण या दोन खात्यांपैकी एका खात्यावरही अजित पवार गटाचा डोळा असल्याचं समजतंय. मात्र अर्थ खातं अजित पवारांना देण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवारांनी आपल्या अनेक आमदारांची कोंडी केल्याची शिवसेनेची भावना आहे. या सगळ्यामुळे, आधी प्रलंबित मंत्रिमंडळ विस्तार करावा, आणि मगच खाेवाटप करावं, अशी भाजप आणि शिवसेनेतील काही नेत्यांची मागणी असल्याचं कळतंय.