Maharashtra Cabinet Decisions मंत्रिमंडळाच्या बैठकित 2 मोठे निर्णय,तुकडाबंदी कायद्यात सुधारणा कोणती?

Continues below advertisement
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये तुकडाबंदी कायद्यातील सुधारणा आणि एसआरए क्लस्टर योजनेला मंजुरी यांचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून रखडलेले जमिनीचे व्यवहार आता तुकडाबंदी कायद्यातील सुधारणांमुळे सुलभ होणार आहेत. या निर्णयानुसार, एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतची एका गुंठ्यापर्यंतची खरेदी आता कायदेशीर मानली जाईल. हा कायदा १९४७ मध्ये शेतजमिनीचे लहान तुकडे होण्यापासून रोखण्यासाठी लागू करण्यात आला होता. पूर्वी अकरा गुंठ्यांपेक्षा कमी जमिनीची खरेदी-विक्री शक्य नव्हती. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, प्राधिकरण क्षेत्र आणि गावठाणालगत दोनशे ते पाचशे मीटरपर्यंतचा भाग या निर्णयात समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच, मुंबईतील झोपडपट्टीवासियांना एसआरए क्लस्टर योजना राबविण्यास मंत्रिमंडळाने हिरवा कंदिल दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola