Maharashtra Cabinet Decisions | मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय, मुंबई,पुणे,ठाण्याला मोठ्ठ गिफ्ट

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने दिव्यांगांसाठीच्या अर्थसहाय्यात वाढ करण्याचा निर्णय झाला. संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेंतर्गत दिव्यांगांना मिळणाऱ्या रकमेत थेट एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार ऐवजी आता अडीच हजार रुपये मिळणार आहेत. पुणे मेट्रोवरील बालाजी नगर आणि बिबवेवाडी या दोन नवीन स्थानकांना मंजुरी मिळाली. तसेच पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. ठाणे वर्तुळाकार मेट्रो, पुण्यातील मेट्रो मार्गिका दोन आणि चार, तसेच नागपूर मेट्रोच्या टप्पा दोनच्या कर्जाला मान्यता मिळाली. मुंबईतील अनिक डेपो वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो मार्गिका अकरा या प्रकल्पालाही मान्यता देण्यात आली. अनुसूचित जमातीतील नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू केली जाईल. एमयूडीपी आणि एमयूडीपी थ्रीए प्रकल्पातील लोकल गाड्यांच्या खरेदीलाही मान्यता मिळाली. ठाणे-नवी मुंबई विमानतळादरम्यान उन्नत मार्ग आणि नागपूर शहराभोवती आऊटर रिंगरोड व चार वाहतूक बेटांची निर्मिती करण्यात येणार आहे. हे निर्णय मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या शहरांसाठी महत्त्वाचे आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola