Maharashtra Cabinet Expansion : शिंदे गटातील तीन मंत्र्यांच्या नावाला भाजपचा विरोध होता? ABP Majha

Continues below advertisement

Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) काल (9 ऑगस्ट) झाला खरा, पण त्याआधी पडद्यामागे घडलेल्या घडामोडी आता समोर येऊ लागल्या आहेत. शिंदे गटातील (Shinde Group) तीन मंत्र्यांच्या नावाला भाजपचा (BJP) विरोध होता, अशी माहिती आता एबीपी माझाला मिळाली आहे. दीपक केसरकर (Deepak Kesarkar), अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला भाजपने विरोध केला होता, असं समजतं. पण एकनाथ शिंदे यांनी ठाम भूमिका घेतल्याने या तिघांच्या मंत्रिमंडळ समावेशाचा मार्ग मोकळा झाला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram