Maharashtra Budget : वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत पिवळ्या रेशन कार्ड धारकांना एक साडी मिळणार
येत्या सप्तेंबर-ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची मुदत संपत असल्याने, अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी साडी वितरण करण्याची महत्वपूर्ण घोषणा केलीय. शिधापत्रिकेवर एका साडीचे वितरण केले जाणार असून. यापूर्वी दक्षिणेतील राज्यांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक प्रचारात साड्या वाटपाचा कार्यक्रम ठेवण्याची प्रथा आहे. आता राज्यातील महायुती सरकारनेही महिलांसाठी साडीवाटपाची महत्त्वाची घोषणा केली केली आहे.