Maharashtra Budget Session : Love Jihad वरुन विधानसभेत गदारोळ, लोढांच्या माहितीवर आव्हाडांचा आक्षेप

Continues below advertisement

Maharashtra Budget Session : Love Jihad वरुन विधानसभेत गदारोळ, लोढांच्या माहितीवर आव्हाडांचा आक्षेप

मोर्चांमुळे रस्त्यांवर तापलेल्या लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून,  आज विधानसभेतही आरोप प्रत्यारोपांच्या ठिणग्या उडाल्या. महाराष्ट्रात १ लाखांहून अधिक लव्ह जिहादची प्रकरणं असल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलीय. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेत एक लाखाचा आकडा आणला कुठून? असा सवाल केला. मात्र मंत्र्यांबाबत बोलायचं असेल तर आधी नोटीस द्या असं सांगत सत्ताधाऱ्यांनी जोरदार गोंधळ घातला. जितेंद्र आव्हाड नेमकी कुणाची वकिली करतायत? असा सवालही सत्ताधाऱ्यांनी विचारला. गुलाबराव पाटील यांनी मतांसाठी लांगूलचालन करू नका असा टोला आव्हाडांना लगावला. तर लव्ह जिहाद हा प्रकार अस्तित्वातच नसल्याचा दावा अबू आझमी यांनी केलाय. त्यावर, आम्ही लव्ह जिहादवर बोलणारच, असा इशारा आशिष शेलार यांनी दिलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram